आरक्षण हा विषय जेव्हा जेव्हा चर्चेला आला तेव्हा तेव्हा आरक्षण विरोधकांनी मेरीट चा मुद्दा अत्यंत आक्रमकपणे मांडला. जणू काही आरक्षणाचा लाभ घेनार्यांकडे मेरीटची वानवा असते अशा पद्धतीने मांडणी केली गेली. आरक्षण समर्थकांना अत्यंत हीन पद्धतीने हिणवले गेले. आरक्षण व्यवस्थेमुळे भारताची नोकरशाही आणि प्रशासन दुर्बल होईल अशा प्रकारच्या टीका केल्या गेल्या. प्रकाश झा च्याच भाषेत बोलायचे झाले तर "हम मेरीट में विश्वास करते है, आरक्षण में नही." थोडक्यात काय तर मागास समाज आणि मेरीट यांचा जन्मोजन्मीचा काहीही संबंध नाही अशीच भारतातील अभिजन वर्गाची धारणा आहे....