प्रकाश झा यांचा “आरक्षण” हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर असतानाचा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. शोषित बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी घटनेने जे आरक्षण दिले आहे त्याच विषयावर हा चित्रपट असल्याने त्याबद्दल वाद निर्माण होणे साहजिक आहे. उलट निर्माण झालेला वाद हा प्रकाश झा यांच्याच पथ्यावर पडण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण कोणतीही चर्चा झाली नसती तर कदाचित हा चित्रपट खूप लोकांनी पहिलाच असता असे नाही. परंतु एका ज्वलंत विषयावर निर्माण केलेल्या चित्रपटाबद्दल वाद निर्माण झाल्यानंतर तो चित्रपट पाहण्याची उत्सुकता निर्माण होते. त्यामुळे आता या चित्रपटाला अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळेल यात शंका नाही. परंतु चर्चा झालीच नाही तर कदाचित एकांगी आणि द्वेषमुलक बाजू मांडली जावू शकते त्यामुळे या विषयी सखोल चर्चा आवश्यक आह...