बळी !
सात काळजाच्या आत जपून ठेवावा, असा निरागस ‘माणूस’ ! आपल्या प्रजेतील प्रत्येक व्यक्तीला तिच्या कष्टाचे व हक्काचे फळ सम्यक रीतीने विभागून देणारा संविभागी नेता !! भारतीयांचे वास्तव आणि विधायक पूर्वसंचित असलेला कृती, प्रकृती आणि संस्कृती यांचा तजेलदार मोहर !!!
आपण मात्र असे धन्य, कि आपण आपल्या डोळ्यादेखत त्यांच्या स्मृतीना खुशाल करपू-कोमेजू दिले; त्यांना आपल्या हृदयापासून सात तटांच्या आणि मस्तकापासून सात उंबरठ्याच्या बाहेरच रोखून धरले. या सगळ्याला थोडे अपवाद असतील, पण इतरापैकी काही जनानी त्यांना विसरून जाण्यात आपले सुख शोधले आणि काही जनानी तर त्यांची निंदा करण्यात पुण्याचा मार्ग पहिला. या लोकांना आज ना उद्या आपल्या अंतर्यामी असलेले त्यांचे अस्तित्व जाणवेल आणि त्या जाणीवेने त्यांचा स्व अक्षरशः मोहरून-बहरून येईल, असा विश्वास आहे. ज्यांनी त्यांचे महात्म्य आधीच ओळखले आहे, त्यांच्यापुढे मात्र आपण नतमस्तक व्हायलाच हवे !
सात काळजाच्या आत जपून ठेवावा, असा निरागस ‘माणूस’ ! आपल्या प्रजेतील प्रत्येक व्यक्तीला तिच्या कष्टाचे व हक्काचे फळ सम्यक रीतीने विभागून देणारा संविभागी नेता !! भारतीयांचे वास्तव आणि विधायक पूर्वसंचित असलेला कृती, प्रकृती आणि संस्कृती यांचा तजेलदार मोहर !!!
बळी – हिराण्याकाशिपुचा पणतू, प्रल्हादाचा नातू, विरोचानाचा पुत्र, कपिलाचा पुतण्या आणि बाणाचा पिता. भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील एक अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्व ! सुमारे साडे तीन ते पाच हजार वर्षापूर्वी होवून गेलेला भारतीय बहुजन समाजाचा एक महानायक, एक महासम्राट, एक महातत्ववेत्ता !
या बळीचा वंश तो बळीवंश. या बळीवंशातील माणसे - आपली माणसे, आपल्या रक्तामासाची माणसे आणि मुख्य म्हणजे आपल्या विचारांची माणसे ! ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपले प्राण गमावणे पत्करले, पण तत्वांशी द्रोह केला नाही, आपल्या श्वासोच्छवासावर दडपणे लादून घेणे मान्य केले नाही, अशी माणसे.आपण मात्र असे धन्य, कि आपण आपल्या डोळ्यादेखत त्यांच्या स्मृतीना खुशाल करपू-कोमेजू दिले; त्यांना आपल्या हृदयापासून सात तटांच्या आणि मस्तकापासून सात उंबरठ्याच्या बाहेरच रोखून धरले. या सगळ्याला थोडे अपवाद असतील, पण इतरापैकी काही जनानी त्यांना विसरून जाण्यात आपले सुख शोधले आणि काही जनानी तर त्यांची निंदा करण्यात पुण्याचा मार्ग पहिला. या लोकांना आज ना उद्या आपल्या अंतर्यामी असलेले त्यांचे अस्तित्व जाणवेल आणि त्या जाणीवेने त्यांचा स्व अक्षरशः मोहरून-बहरून येईल, असा विश्वास आहे. ज्यांनी त्यांचे महात्म्य आधीच ओळखले आहे, त्यांच्यापुढे मात्र आपण नतमस्तक व्हायलाच हवे !
बळी हा कुलस्वामी : महात्मा फुले
महात्मा फुले यांनी दस्युचा पोवाडा म्हणून जो पोवाडा लिहिला आहे, त्याच्या तिसऱ्या कडव्याची सुरुवातच त्यांनी ‘बळी राज्यादी कुळस्वमिला’ या शब्दांनी केली आहे. येथे ‘राज्यादी’ हा शब्द ‘राजादी’ या अर्थाने आला आहे. कारण, बळीच्या राज्याला कुळस्वामी म्हणणे, हे आशयाच्या दृष्टीने जुळत नही. याउलट बळीराजाचा तसं निर्देश करणे हे मात्र पूर्णपणे सुसंगत ठरते. महात्मा फुले बळीराजाला कुलस्वामी मानतात, याचाच अर्थ ते त्याला आपला अत्यंत आदरणीय पूर्वज मानतात. या उल्लेखाद्वारे ते एक प्रकारे बळीराजाबरोबरचे आपले नातेच सांगून टाकतात. कुळस्वामिकडे हल्ली देवता म्हणून पहिले जात असले, तरी कुळस्वामी म्हणजे मूळ पुरुष, हाच खराखुरा अर्थ आहे, हे आपण ध्यानात घेतले पाहिजे.
बळी राज्यादी कुळस्वामिला, डाग लाविला, दंग क्लेशांत !
अन्नावाचून होती हाल, केली कमाल, सर्व जगात !
संदर्भ- बळीवंश , लेखक डॉ. आ. ह. साळुंखे
8 टिप्पणी(ण्या):
बळीराज्याला मारणाऱ्या वामनाला काय म्हणून पुजता ???
इडा पिडा टाळू दे ! बळी राज्याचं राज्य येऊ दे !!
बलिपूजन आणि वामन दहन या दोन गोष्टी दिवाळीला करायला हव्यात
संवेदनशील माणसेच विद्रोह करू शकतात .जी लोक संवेदनशील नसतात ती गुलामी स्वीकारतात .म्हुणुन वामन दहन करून संवेदनशील वृतीच दर्शन घडवू ..............
Mahatma bali ani vaman he don paraspar virodhi vicharanche, sanskrutiche samarthak ahet. Jar apanala baliraja pujniy asel tar vaman apala dev kasa? Ani vamanachi arya/vaidik/bramhani/sanatan sanskruti apali sanskruti kashi? Baliraja asur hota, mag asurach apale purvaj nahit ka? Vichar kara...
gr8 yar, keep it up, bravo.
We all r with you friend.
बळीराजा हा बहुजन असल्यामुळे बामन वामनाने त्याला पाताळात घातले म्हणजेच कपटाने ठार केले. आणि आपणही वामनाची पूजा करून बळी चा धिक्कार करतो. उठा बहुजानानो, जागे व्हा आणि बळीच्या स्मृतीना माविन पालवी फुटू द्या.
प्रकाश,
एकदम भारी.
आता हा बदल झालाच पाहिजे.
असच लिहत रहा.
शुभेच्छा.
आमुच्या देशीचे अतुल स्वामी वीर ||
होते रणधीर ||मरुत्यास ||
बळीस्थानी आले शूर भैरोबा ||
खंडोबा,जोतिबा || महासुभा ||१||
सद् गुणी पुतळा राजा मुळ बळी ||
दशहरा,दिवाळी ||आठविती ||२||
क्षत्रिय भार्या "इडा पीडा जाओ ||
बळी राज्य येवो "||अशा का बा ?||३||
आर्य भट आले,सुवर्ण लुटिले ||
क्षत्री दास केले ||बापमत्ता ||४||
वामन का घाली बळी रसातळी ||
प्रश्न जोतीमाळी ||करी भटा ||५||
-महात्मा जोतीराव फुले.
आमुच्या देशीचे अतुल स्वामी वीर ||
होते रणधीर ||मरुत्यास ||
बळीस्थानी आले शूर भैरोबा ||
खंडोबा,जोतिबा || महासुभा ||१||
सद् गुणी पुतळा राजा मुळ बळी ||
दशहरा,दिवाळी ||आठविती ||२||
क्षत्रिय भार्या "इडा पीडा जाओ ||
बळी राज्य येवो "||अशा का बा ?||३||
आर्य भट आले,सुवर्ण लुटिले ||
क्षत्री दास केले ||बापमत्ता ||४||
वामन का घाली बळी रसातळी ||
प्रश्न जोतीमाळी ||करी भटा ||५||
-महात्मा जोतीराव फुले.
MARATHE HAJARO WARSHE BAHUJANANWAR JULUM KARAT AHET .AJ BRAHMAN FUCT 3% AHET.MARATHE GAVAGAVATUN PRACHAND JULUM KARAT AHET.SHEVATCHI LADHAI MARATHYAN JAWALCH AHE.
(JAI BHIM)
मराठे दलितांना ब्राह्मणांच्या विरोधात भडकवत आहेत आणि ब्राह्मण दलितांना मराठ्यांच्या विरोधात वापरत आहेत. दोघांचीही मानसिकता दलितांना वापरून फेकून देण्याचीच आहे हे वास्तव दलित समाज पुरेपूर जाणतो. म्हणून आता जय भीम ही घोषणा करून आणि बाबासाहेबांच्या फोटोपुढे गळे काढून दलितांना मूर्खात काढता येईल ही आशा सोडून द्या. तुम्हीच आमच्यावर एकजुटीने आणि संगनमताने दलितत्वाचा शिक्का मारला. आता तुमच्या पायाखालची जमीन सरकल्यावर तुम्हाला अचानक दलितांचा कळवळा का आला आहे हे न समजण्याइतका दलित समाज दुधखुळा नाही.
टिप्पणी पोस्ट करा
सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.
-प्रकाश पोळ