
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुका. या तालुक्यातील जुवे एक बेट. स्वतंत्र ग्रामपंचायत. जैतापूरपासून साधारण २-३ किमी. क्षेत्रफळ ४२ हेक्टर. लोकसंख्या अवघी ७८. पण घरं १०० च्या वर. बहुतांशी लोक मुंबईला स्थायिक. चारही बाजूने समुद्राने वेढलेलं हे गाव. गावात भंडारी आणि कुणबी समाजाची प्रामुख्याने वस्ती. मासेमारी हाच प्रमुख व्यवसाय. गावात जायला भूमार्ग नाही. समुद्रातून होडीने जायचे. जमिनीपासून साधारण ४०० मीटर आत. गावात एक प्राथमिक शाळा. पहिली ते चौथी. विद्यार्थी फक्त २. इयत्ता तिसरीतील. शिक्षक एक. पाचवीपासून पुढे जैतापूरला जावे लागते. ७ विद्यार्थी जैतापूरच्या हायस्कुलला जातात. रोज होडीतून प्रवास करून जायचे. गावातील लोकांनाही इतर ठिकाणी जाण्यासाठी होडीतून प्रवास करून जावे लागते. ...