
हिंसाचाराचा उगम आपणाला टोळीजीवनापासूनच दिसून येतो. पूर्वीच्या काळी जेव्हा समाज टोळी जीवन जगात होता, तेव्हा दोन टोळ्यांमधील परस्पर संबंधात मोठ्या प्रमाणात हिंसाचाराचा उद्भव दिसून येतो. त्या टोळ्यांमध्ये स्त्रिया तसेच शिकार अशा अनेक कारणांवरून झगडे होत असत. हिंसाचार हा टोळी जीवनाचा एक अविभाज्य भागच बनून गेला होता. टोळी जीवनातील रूढ संकेतांनुसार हा हिंसाचार समाजमान्य होता. म्हणजे एका टोळीने दुसर्या टोळीवर ...