आज तुमच्याशी संवाद साधताना खूप आनंददायी भावना मनात आहे. २०१५ वर्ष संपता
संपता
सह्याद्री बाणा या ब्लॉगला पाच वर्ष पूर्ण झाली. २९ नोव्हेंबर २०१०
रोजी सह्याद्री बाणा हा ब्लॉग चालू केला. बहुजन हितासाठी चालू केलेल्या या
ब्लॉगला वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या २९ नोव्हेंबर ला ब्लॉगला पाच
वर्ष पूर्ण झाल्याचे निमित्त साधून ब्लॉगच्या पाच वर्षाच्या कामगिरीचा
थोडक्यात आढावा घ्यावा असा विचार आहे.
वर सांगितल्याप्रमाणे सह्याद्री बाणा या ब्लॉगची निर्मिती २९ नोव्हेंबर २०१० रोजी केली. त्याआधीदोन-अडीच वर्ष मी
"विद्रोही विचार मंच" नावाचा ब्लॉग चालवत होतो. मुळात ब्लॉग तयार करण्याची गरज का पडली हेही समजून घेणे योग्य ठरेल. पुरोगामी विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी आणि आपल्या मनातील विचार व्यक्त करण्यासाठी एखादे व्यासपीठ हवे होते. वैचारिक वाचन चालूच होते. त्यामुळे अनेक विचार सुचत, अनेक विचारांवर प्रतिक्रिया द्यावीशी वाटे. समाजात आपल्या आजूबाजूला घडणार्या अनेक गोष्टींवर मतप्रदर्शन करावे वाटे. त्यामुळे लोकमत, पुढारी अशा वर्तमानपत्रातून 'वाचकांचा पत्रव्यवहार' या सदरातून लिहिता झालो. लोकमत आणि पुढारीतून जवळजवळ शंभरभर पत्रे प्रसिद्ध झाली. यातील काही पत्रे विद्रोही विचार मंच या ब्लॉगवर टाकली आहेत. वाचकांचा पत्रव्यवहार मधून लिहिता लिहिता कराड, सातारा येथील स्थानिक वर्तमानपत्रातून लेख लिहू लागलो. स्थानिक वृत्तपत्रे लेख प्रसिद्ध करायचे,