20 ऑगस्ट 2013 रोजी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची पुण्यात हत्या झाली. दाभोळकरांचे मारेकरी पोलीसाना सापडू शकले नाहीत. निदान या प्रकारामागे कोणत्या शक्ती होत्या याचाही अंदाज पोलीसाना आला नाही. हे दुर्दैवी असले तरी सत्य आहे. त्यानंतर बरोबर दिड वर्षानी कॉ. गोविंदराव पानसरे यांच्यासारख्या पुरोगामी, डाव्या विचाराच्या नेत्यावर खुनी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात पानसरे अण्णा आणि त्यांच्या पत्नी उमा गंभीर ...