
गणपतीपूजनाचे भौतिक पुरावे आपल्याला सिंधू संस्कृतीकाळापासून मिळतात. हडप्पा येथे गणपती शीर्षाचे शिल्प मिळाले आहे. म्हणजेच भारतात गणपतीपूजन हे किमान पाच हजार वर्षं जुने आहे. तंत्र-गणपतीमुळे तो जगभर पसरला. अवैदिक शैवजनांचा गणपती कालौघात वैदिकजनांनीही आपले धर्मसंस्कार करत स्वीकारला. गणपती या दैवताचा विकास कालौघात कसा झाला याचा दैवतेतिहासाच्यासंदर्भात धर्मशास्त्राचे अभ्यासक संजय सोनवणी घेतलेला रोचक धांडोळा.....