
डॉ . बाबासाहेब आंबेडकर
लेखक - संजय सोनवणी.
महान नेत्यांचे अद्वितीय लक्षण म्हणजे त्यांची दूरदृष्टी. वर्तमान व
भवितव्यातील समस्या कायमस्वरुपी यशस्वीपणे सोडवण्यासाठी लागणारी असामान्य
प्रतिभा आणि उपायांची नेटाने केलेली राबवणुक. डा. बाबासाहेब आंबेडकर यांचे
मानवजातीला अनेक क्षेत्रांत अनमोल योगदान आहे. बाबासाहेबांची प्रज्ञा
बहुमुखी होती. १९३४ साली रिझर्व ब्यंकेची जी स्थापना झाली ती
अर्थशास्त्रज्ञ या नात्याने हिल्टन यंग कमिशनसमोर बाबासाहेबांनी जे
प्रस्ताव ठेवले होते त्या आधारावरच झाली हे सहसा आपल्याला माहि...