स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रातील बदलत्या
सामाजिक-सांस्कृतिक जाणिवांवर मूलभूत चिंतन करणाऱ्या, हाताच्या बोटांवर
मोजता येणाऱ्या विचारवंतांमध्ये डॉ. आ. ह. साळुंखे यांचे नाव घ्यावेच
लागते. महाराष्ट्राच्या भविष्याबाबत त्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने
तयार केलेले सांस्कृतिक धोरण थोरामोठय़ांकडून वाखाणले गेले. सांगली जिल्हय़ात
खाडेवाडीसारख्या छोटय़ा गावात १९४३ मध्ये शेतकरी कुटुंबात साळुंखे जन्माले.
आयुष्यभर नांगर ओढत, पाण्याच्या पखाली वाहण्याचेच काम करावे लागता कामा
नये याची पक्की जाणीव आ. ह. साळुंखे यांना असली पाहिजे; डॉ. बाबासाहेब
आंबेडकर आणि गौतम बुद्ध ही त्यांची केवळ दैवते नव्हती, ...