शनिवार, ऑगस्ट ३१, २०१३

सावधान! सनातन 'शक्ती' वाढतेय..

डॉ. नरेंद्र दाभोळकर
बहुजन आणि अभिजन वारकरी अशा दोन वर्गांत वारकरी विभागले आहेत. बहुजन वारकर्‍यांनी संत तुकारामांच्या शिकवणुकीप्रमाणे कायम अंधश्रद्धेविरुद्ध भूमिका घेतली आहे. संत तुकाराम म्हणतात, 'तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी, शेंदरी हेंदरी दैवते, कोणी ती पूजते भूतेखेते' या विचारांवर श्रद्धा असणारे वारकरी अंधश्रद्धा विधेयकाला विरोध करतील का?-
राही भिडे

काय आहे जादूटोणाविरोधी विधेयकात?

तुम्हीच ठरवा : अंधश्रद्धेवर प्रहार की श्रद्धेवर आच?
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि अंधश्रद्धाविरोधी चळवळीचे अग्रणी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात हत्या झाल्यानंतर त्यांनी दीर्घकाळ ज्यासाठी लढा दिला त्या जादुटोणा विरोधी विधेयकाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या विधेयकातील तरतुदींवर वेगवेगळी मते व्यक्त होत असताना त्यात नेमके काय आहे, हे जाणून घेतल्यास हे विधेयक म्हणजे श्रद्धेवर घाला आहे की अंधश्रद्धेवर प्रहार याचा फैसला लोक करू शकतील.

जादूटोणाविरोधी विधेयकाचा खडतर प्रवास


१९९५ पासून मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या अंधश्रद्धा निर्मुलन आणि जादूटोणाविरोधी कायदा संमत व्हावा यासाठी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी पाठपुरावा केला. त्यासाठी सत्त्ताधारी आणि विरोधकांच्या गाठी-भेटी घेतल्या. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळूनही विधिमंडळाच्या पटलावर त्यातील काही तरतुदींमुळे ते रखडले. त्यावरून खडाजंगीही झाली.


विधेयकाचा खडतर प्रवास 

बुधवार, ऑगस्ट २८, २०१३

सनातन विकृती



ता. २० ऑगस्ट २०१३ रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची सुसंस्कृत पुण्यामध्ये गोळ्या घालून निर्घृण हत्या झाली. डॉ. दाभोलकरांचे कार्य इतक्या मोठ्या प्रमाणात समाजात पसरत चालले होते कि संकुचित मनुवादी प्रवृत्त्तींनी त्यांची खूपच धास्ती घेतली होती. समाजाला जाती-धर्माची, अंधश्रद्धेची नशा पाजून आपली तुंबडी भरणारे महाभाग समाजात भरपूर आहेत. या महाभागांनी दाभोलकर आणि अंनिसबद्दल आजपर्यंत खूप अपप्रचार केला. दाभोलकर हयात असताना त्यांच्याबद्दल खूपच असभ्य भाषेत टिकाटिपण्णी करण्यात येत होती. परंतु हिंदू धर्म-संस्कृतीचा ठेका घेतलेले हे लोक किती खालच्या पातळीवर उतरू शकतात याचा अनुभव साऱ्या महाराष्ट्राने दाभोलकरांच्या हत्येनंतर घेतला.

मंगळवार, ऑगस्ट २७, २०१३

डॉ. नरेंद्र दाभोलकर जीवनवृत्तांत

डॉ. नरेंद्र अच्युत दाभोलकर, सातारा.
जन्मतारीख- ०१/११/१९४५
शिक्षण- एम.बी.बी.एस. (१९७०)
वैद्यकीय व्यवसाय- १९७०-८२
Ø  १९८२ सालानंतर अंधश्रद्धा निर्मुलन चळवळीचे पूर्णवेळ कार्यकर्ते. अंधश्रद्धा, बुवाबाजीच्या विरोधात सतत संघर्ष, लेखन, भाषण. आजवर हजारो व्याख्याने, शेकडो लेख, आकाशवाणी, दुरचित्र वाहिन्या यातील अनेक कार्यक्रमांत सहभाग. अंधश्रद्धा निर्मुलन व वैज्ञानिक दृष्टीकोन याच्या विविध पैलूंवर बारा पुस्तकांचे लेखन. महाराष्ट्र शासनाने जादूटोणा विरोधी कायदा करावा या प्रक्रियेत महत्वाचा

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या- पुरोगामी महाराष्ट्राला लांच्छन


३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे या पुण्यातील धर्मांध विचाराच्या (?) व्यक्तीने हत्या केली. महात्मा गांधींचे विचार पटत नसलेला एक वर्ग त्याकाळी होता. त्या गांधीविरोधी गटाचा महात्मा गांधी आणि त्यांच्या विचारांना विरोध होता. परंतु वैचारिक संघर्ष करण्याची त्यांची कुवत नव्हती त्यामुळे त्यांनी गांधींचा विचार संपवण्यापेक्षा गांधीनाच संपवले. कारण तसे करणे सोयीस्कर होते. परंतु त्या मूर्खाना एवढे कळत नव्हते कि माणूस मारून त्याचे विचार मरणार नाहीत.

शनिवार, जुलै ०६, २०१३

सोमवार, एप्रिल १५, २०१३

आधुनिक भारताचे शिल्पकार:डा.बाबासाहेब आंबेडकर

डॉ.  बाबासाहेब आंबेडकर
प्रा. हरी नरके  
आधुनिक भारताच्या सर्वांगिण उभारणीमध्ये ज्या नेत्यांचे महत्वपुर्ण योगदान आहे त्यात डा‘.बाबासाहेब आंबेडकर अग्रस्थानी आहेत.स्त्री-पुरुष समता, जातीनिर्मुलन, संसाधनांचे फेरवाटप,सर्वांना शिक्षण,धर्मचिकित्सा ही मुलभुत विषयपत्रिका घेवून त्यांनी लढे उभारले. संवैधानिक हक्क, समाज प्रबोधन, संघटन, संघर्ष याद्वारे बाबासाहेबांनी राजसत्ता,अर्थसत्ता,धर्मसत्ता, प्रशासन, न्यायव्यवस्था, ज्ञानसत्ता, सांस्कृतिक सत्ता, माध्यमसत्ता या सगळ्यात स्त्रिया आणि अनुसुचित जाती,जमाती, भटके विमुक्त, इतर मागास वर्गिय, अल्पसंख्याक यांना प्रतिनिधित्त्व मिळाले पाहिजे यासाठी ते झुंजले. स्वत: आयुष्यभर लेखन,वाचन,चिंतन आणि ज्ञाननिर्मितीच्या कामात बाबासाहेब समर्पित राहिले. त्यांनी सर्व वंचित,दुबळे, पिडीत यांना अस्तित्त्व,उर्जा, अस्मिता आणि प्रकाश दिला.

रविवार, एप्रिल ०७, २०१३

ओबीसी आरक्षण संकटात! मागासजातीय संघटना रस्त्यावर उतरणार- ओबीसी नेते श्रावण देवरे यांचे पत्रक

 प्रा. श्रावण देवरे
मराठा समाजाला घटनाबाहृय पद्धतीने ओबीसींच्या यादीत घुसविण्याचा प्रयत्न महराष्ट्र शासन करीत आहे. असंख्य ओबीसी कार्यकर्त्यांनी प्रदिर्घ काळ संघर्ष करुन मिळविलेले ओबीसी आरक्षण धोक्यात आले असून ते वाचविण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व ओबीसी संघटना रस्त्यावरच्या संघर्षाची तयारी करीत आहेत. या आंदोलनाची सुरुवात दि. 9 एप्रील मंगळवार रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर एक दिवसाच्या धरणे आंदोलनाने होत आहे, अशी माहिती एका पत्रकाद्वारे ओबीसी संघटनेचे उपाध्यक्ष श्रावण देवरे यांनी दिली आहे.

शनिवार, मार्च ३०, २०१३

जलसंपत्ती...दुष्काळ आणि बाबासाहेब!



डॉ .  बाबासाहेब  आंबेडकर 
लेखक - संजय सोनवणी.  
महान नेत्यांचे अद्वितीय लक्षण म्हणजे त्यांची दूरदृष्टी. वर्तमान व भवितव्यातील समस्या कायमस्वरुपी यशस्वीपणे सोडवण्यासाठी लागणारी असामान्य प्रतिभा आणि उपायांची नेटाने केलेली राबवणुक. डा. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानवजातीला अनेक क्षेत्रांत अनमोल योगदान आहे. बाबासाहेबांची प्रज्ञा बहुमुखी होती. १९३४ साली रिझर्व ब्यंकेची जी स्थापना झाली ती अर्थशास्त्रज्ञ या नात्याने हिल्टन यंग कमिशनसमोर बाबासाहेबांनी जे प्रस्ताव ठेवले होते त्या आधारावरच झाली हे सहसा आपल्याला माहित

बुधवार, जानेवारी ०९, २०१३

साहित्य संमेलनावर वादाचा ‘परशु’

साहित्य संमेलन आणि वाद हे समीकरण काही नवे नाही. प्रत्येक साहित्य संमेलनात साहित्यबाह्य विषयावरून वाद होतात आणि ते संमेलन इतर गोष्टींसाठीच लक्षात राहते. जो मूळ हेतू लक्षात घेऊन या साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते तो हेतू सफल करण्याचे प्रयत्न कितपत होतात असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. कारण साहित्य महामंडळाचे कारभारी आणि स्थानिक संयोजन समिती कशा प्रकारे वाद निर्माण करत असतात हे दरवर्षी आपण पाहत आहोतच. यावेळचे साहित्य संमेलन तर अनेक कारणांनी गाजत आहे. या संमेलनातील वादाची सुरवात झाली ती अध्यक्षीय निवडणुकीतील ह. मो. मराठे जातीयवादी प्रचाराने. ब्राम्हण मतांचे धृविकरण आपल्या

साहित्य संमेलनातील वाद - बाळासाहेब ठाकरे आणि हमीद दलवाई


बाळासाहेब ठाकरे
यंदाचे साहित्य संमेलन परशुरामाच्या एकाच वादापुरते मर्यादित नाही. संमेलनाच्या व्यासपीठाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याला पुष्पा भावेंनी विरोध केल्यामुळे वातावरण आणखीनच तापले. १९९९ च्या साहित्य संमेलनाच्या वेळी बाळासाहेब ठाकरे यांनी साहित्यिकांची संभावना बैल अशी केली होती. त्यावेळी सर्व स्तरातून या गोष्टीचा निषेध झाला होता. परंतु काही दिवसापूर्वी बाळासाहेबांचे निधन झाल्याने त्यांचा सन्मान करण्यासाठी त्यांचे

गुरुवार, डिसेंबर २७, २०१२

75 years of ‘Annihilation of Caste- प्रा. हरी नरके यांचे भाषण

सौजन्य: अलोक जत्राटकर,सहा.कुलसचिव,शिवाजी विद्यापिठ,कोल्हापुर

शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागातर्फे नाताळच्या दिवशी एका महत्त्वपूर्ण अशा राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले. ’75 years of ‘Annihilation of Caste’- Tracing the Journey of Caste System in India ’ असा या दोन दिवसीय चर्चासत्राचा विषय होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ‘Annihilation of Caste’ हे पुस्तक १९३६ साली प्रकाशित झालं. भारतीय जातिनिर्मूलनाच्या चळवळीसाठी कालातीत रसद पुरवणाऱ्या या पुस्तकाची पंचाहत्तरी आणि आजच्या काळातील त्याचं महत्त्व,

बुधवार, डिसेंबर २६, २०१२

स्त्रियांवरील वाढते अत्याचार : सामाजिक अवनतीचे लक्षण


- प्रकाश पोळ.
दिल्ली येथे एका अभागी भगिनीवर झालेल्या सामुहिक अत्याचाराने सारा देश खडबडून जागा झाला आणि स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. दिल्लीतील त्या मुलीवर जो प्रसंग ओढवला तो माणुसकीला काळिमा फासणारा आहे. माणसाची नैतिकता किती खालावलेली आहे हेच या घटनेवरून दिसून येते. ती मुलगी रात्री १० च्या सुमारास आपल्या मित्राबरोबर एका खाजगी बसमधून प्रवास करत असताना तिच्यावर पाच जणांच्या टोळक्याने सामुहिक बलात्कार केला. त्यानंतर तिला प्रचंड शारीरिक यातना देवून तिच्या मित्रासह बसमधून फेकून दिले. ती तरुणी आजही हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे. तिच्यावरील अत्याचाराचे पडसाद संपूर्ण देशभर उमटले. मिडीयाने या घटनेला

गुरुवार, ऑक्टोबर २५, २०१२

अवैदिक गणपती : शंकर पार्वती यांचा पुत्र आणि गणांचा प्रमुख

डॉ. आ. ह. साळुंखे यांनी त्यांच्या "बळीवंश" या ग्रंथात प्राचीन वैदिक ग्रंथातील काही पुरावे दिले आहेत. असुर व्यक्ती गणपती होत्या आणि असुर आणि शिवाचे नाते  याचे काही पुरावे . 

गणपतीचे मूळ, गणपती उत्सव आणि बहुजन समाज

अवैदिक गणपती : शंकर पार्वती यांचा पुत्र आणि गणांचा प्रमुख
गणपती हा शंकर आणि पार्वती यांचा पुत्र आणि गणांचा प्रमुख म्हणून विख्यात आहे. शंकराचे भक्त, सेवक आणि सैनिक असलेल्या गणांचा प्रमुख म्हणून त्याला गणपती, गणेश अशी नवे प्राप्त झाली आहेत. गणपती हे केवळ एखाद्या व्यक्तीचे वा देवतेचे नाव आहे, या दृष्टीने गणपतीकडे पाहण्याऐवजी एक अत्यंत महत्वाचे पद या दृष्टीने त्याच्याकडे पाहणे, हा खरा ऐतिहासिक दृष्टीकोन होय. शंकर

शनिवार, ऑगस्ट ०४, २०१२

महाराजा तुकोजीराव होळकर (III) - भाग ३

तुकोजीरावांचा आंतरधर्मीय विवाह

तुकोजीराव होळकर (III)
बावला खून खटल्यानंतर  १९२६ मध्ये तुकोजीराव यांनी गादी सोडली आणि युरोप-अमेरिकेकडे रवाना झाले. तिथेच त्यांची ओळख मिस मिलर यांच्याशी झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले आणि तुकोजीरावानी मिलर यांच्याशी लग्न करायचे ठरविले. १९२८ मध्ये तुकोजीराव मिलर यांना घेवून भारतात आहे. त्यांनी तिच्याशी रीतसर लग्न केले. मिलर यांनी हिंदू धर्म स्वीकारला. लग्नानंतर त्यांचे नाव शर्मिष्ठादेवी असे झाले. तुकोजीराव आणि शर्मिष्ठादेवी आयुष्यभर एकत्र राहिले. परंतु त्यांच्या लग्नाबद्दलही जाणीवपूर्वक अफवा पसरवण्याचे काम चालू आहे. इंटरनेट वर अनेक ब्लॉगधारकांनी बावला खून

महाराजा तुकोजीराव होळकर (III) - भाग २

                                 बावला खून खटला
महाराजा तुकोजीराव होळकर (III)
   बावला खून खटला हे तुकोजीरावाच्या आयुष्यातील अतिशय दुर्दैवी प्रकरण होय. या प्रकरणात त्यांची खूप बदनामी झाली, त्यांना विनाकारण मनस्ताप सोसावा लागला. शेवटपर्यंत या खून खटल्यात तुकोजीरावांचा सहभाग असल्याचा एकही पुरावा सापडला नाही, तरी कपाळकरंट्या लोकांनी तुकोजीरावच मुख्य आरोपी आहेत असे मानून या प्रकरणाची मांडणी केली .
बावला खून खटल्याची थोडक्यात कहाणी अशी की, 

शुक्रवार, ऑगस्ट ०३, २०१२

महाराजा तुकोजीराव होळकर (III) - भाग १

तुकोजीराव होळकर (III)
आपल्या समाजात अनेक महामानवांनी सामाजिक सुधारणा घडवून आणल्या आहेत. त्यामध्ये विचारवंत, लेखक ज्याप्रमाणे आहेत त्याचप्रमाणे प्रत्यक्ष सत्ता हातात असणारे राजे, महाराजे, संस्थानिक सुद्धा आहेत. यामध्येच इंदूरचे महाराजा तुकोजीराव होळकर तृतीय यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. परंतु तुकोजीरावांचे सामाजिक काम समाजासमोर फारसे मांडले गेले नाही. आणि जर कुणी तुकोजीरावांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतलाच तर समाजात त्यांच्याबद्दल आदरभाव निर्माण होवू नये म्हणून प्रस्थापित लेखणीबहाद्दार आणि सनातनी लोकांनी तुकोजीरावांची एवढी बदनामी केली की त्यापुढे त्यांचे सामाजिक कार्य झाकोळून जाईल. त्यामुळे तुकोजीरावांचे सामाजिक कार्य समाजासमोर मांडण्याचा आणि त्यांच्यावरील आरोपांचे खरे स्वरूप दाखवण्याचा हा लेखनप्रपंच.

संभाजी ब्रिगेडने विचार करावा

वाघ्याला हटवण्याची संभाजी ब्रिगेडची कृती फुले-शाहू-आंबेडकरवादास घातक या लेखाचा उद्देश संभाजी ब्रिगेडची बदनामी करणे नाही हे लेख संपूर्ण वाचल्यानंतर लक्षात येईल. मी स्वतः संभाजी ब्रिगेडबरोबर काम केले आहे. त्यामुळे त्यांची कार्यपद्धती मला माहित आहे. त्यांच्या कार्याने विचाराने प्रभावित होवून मी त्यांच्याबरोबर काम केले आहे. प्रश्न केवळ ब्रिगेडचा नाही. कोणतीही बहुजनवादी, पुरोगामी संघटना या माझ्यासाठी आदरणीय आहेत. वेळोवेळी अशा सर्व संघटनांमध्ये मी काम करीत आलो आहे. परंतु ब्रिगेड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा एक प्रॉब्लेम आहे. तो म्हणजे ते

गुरुवार, ऑगस्ट ०२, २०१२

वाघ्याला हटवण्याची संभाजी ब्रिगेडची कृती फुले-शाहू-आंबेडकरवादास घातक


अखेर रायगडवरील बहुचर्चित वाघ्या कुत्र्याचा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हटवला. गेले अनेक दिवस वाघ्या कुत्र्याच्या प्रश्नावरून उलट-सुलट चर्चा चालू होती. दादोजी कोंडदेव यांचा पुतळा काढल्यानंतर संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेत रायगडवरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढण्यासाठी जोरदार आंदोलन उभे केले होते. वाघ्याचा पुतळा शिवरायांच्या एका महाराणीच्या समाधीवर ब्राम्हणांनी जाणीवपूर्वक उभा केला आहे. त्यामुळे छत्रपती शिवराय आणि त्यांच्या महाराणी यांची बदनामी करणाऱ्या या कुत्र्याचा पुतळा रायगडवरून काढून टाकावा अशी संभाजी ब्रिगेडची भूमिका होती. (संभाजी ब्रिगेडच्या सविस्तर भूमिकेसाठीक्लिक करा.) परंतु रायगडवरील शिवस्मारकाला इंदूरचे महाराजा तुकोजीराव होळकर तृतीय यांनी आर्थिक मदत केली असल्याने धनगर समाजाचा वाघ्याचा पुतळा काढण्याला विरोध होता. महाराजा तुकोजीराव होळकर तृतीय यांच्या देणगीतून वाघ्याचा पुतळा रायगडावर उभा करण्यात आला. (त्यासाठी होळकरांच्या कुत्र्याची दंतकथाही निर्माण करण्यात आली.) 

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes