बुधवार, डिसेंबर ३०, २०१५
शनिवार, ऑक्टोबर ३१, २०१५
आरक्षण आणि गुणवत्ता यांचा संबंध काय ?
'राष्ट्रहिताच्या द्रुष्टीने उच्च शैक्षणिक संस्थांमधील आरक्षण रद्द होण्याची गरज' (लोकसत्ता, 28ऑक्टो.) ही बातमी वाचली. आंध्र आणि तेलंगाणा या राज्यानी वैद्यकीय संस्थांमधील सुपरस्पेशालिटी कोर्सेसच्या प्रवेशासाठी संबंधित राज्यांच्या रहिवासाची अट घातली होती.याविरुद्ध काही जणानी याचिका दाखल केली असता सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण धोरणासंबंधी काही मते मांडली.
सोमवार, ऑगस्ट १७, २०१५
बुधवार, मे १३, २०१५
बाबासाहेब पुरंदरे, महाराष्ट्र भूषण आणि सांस्कृतिक दहशतवाद
बाबासाहेब पुरंदरे याना महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केल्याने वाद निर्माण झाला आहे. पुरंदरे हे शिवचरित्राचे अभ्यासक मानले जातात. त्यानी 'राजा शिवछत्रपती' ही कादंबरी लिहिली आहे. पुरंदरे यांच्या समर्थकांचे असे म्हणने आहे कि पुरंदरे यानी शिवराय घराघरात पोहचवले. शिवचरित्राचा प्रचार आणि प्रसार करण्यात पुरंदरे यांचा मोलाचा वाटा आहे.
सोमवार, फेब्रुवारी १६, २०१५
दाभोळकर, पानसरे झाले...आता पुढचा नंबर कोणाचा ?
20 ऑगस्ट 2013 रोजी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची पुण्यात हत्या झाली. दाभोळकरांचे मारेकरी पोलीसाना सापडू शकले नाहीत. निदान या प्रकारामागे कोणत्या शक्ती होत्या याचाही अंदाज पोलीसाना आला नाही. हे दुर्दैवी असले तरी सत्य आहे. त्यानंतर बरोबर दिड वर्षानी कॉ. गोविंदराव पानसरे यांच्यासारख्या पुरोगामी, डाव्या विचाराच्या नेत्यावर खुनी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात पानसरे अण्णा आणि त्यांच्या पत्नी उमा गंभीर
सोमवार, नोव्हेंबर २४, २०१४
ऐसे कैसे झाले भोंदू
देव कोणाला म्हणावं ? संत कोण आहे हे कसं ओळखावं ? या प्रश्नांची उत्तरे संत तुकोबानी साडेतीनशे वर्षांपूर्वीच दिली आहेत. तुकोबा म्हणतात,
"जे का रंजले गांजले,
त्यासी म्हणे जो आपुला,
तोची साधू ओळखावा,
देव तेथेची जाणावा..."
साडेतीनशे वर्षांपूर्वी जे तुकोबांना उमगलं ते आज एकवीसाव्या शतकात आपणाला कळू नये यासारखी शोकांतिका नाही. दोन दिवसांपूर्वी हरियाणातील हिस्सार येथील रामपाल या तथाकथित बाबाला पोलीस कारवाई
गुरुवार, नोव्हेंबर १३, २०१४
MPSC : सवलत घेणाऱ्या मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गात बंदी अन्यायकारक
नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मागासवर्गीयांच्या खुल्या जागेवर होणार्या शिफारसीबाबत एक दुर्दैवी निर्णय घेतला आहे. मागासवर्गीयांसाठी असणार्या वय/परिक्षा शुल्क अशा प्रकारच्या कोणत्याही सवलतींचा लाभ मागास वर्गातील उमेदवाराने घेतला तर त्यांची खुल्या गटातील जागेसाठी शिफारस होणार नाही अशा प्रकारचा हा निर्णय आहे. दैनिक लोकसत्तामध्ये ही बातमी वाचनात आली. याआधी मागासवर्गीय उमेदवारांचे मेरिट खुल्या जागेच्या 'कट ऑफ' पेक्षा जास्त असेल तर त्यांची निवड खुल्या गटातून होत असे. समजा खुल्या गटाचे 'कट ऑफ' 100 पैकी 50 असेल, तर ज्या मागासवर्गीय उमेदवारांचे मेरिट 50 किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्यांची निवड खुल्या गटातून व्हायची. परंतु एमपीएससी च्या या सुधारित निर्णयानूसार मागासवर्गीयांसाठी असणार्या कोणत्याही सवलती या वर्गातील उमेदवाराने घेतल्या तर त्यांचा खुल्या गटावरील दावा नाकारला जाणार आहे. वास्तविक मागास वर्गांना आरक्षण देताना घटनेने त्यांना त्याच वर्गापूरते मर्यादित ठेवलेले नाही. आरक्षित जागेवर त्याच वर्गातील उमेदवार दावा करु शकतात. खुल्या जागा मात्र सर्वांसाठी असतात. त्यामूळे मागास वर्गातील उमेदवारांवर विविध बंधने लादून त्यांचा खुल्या जागेवरील दावा नाकारण्याचा प्रयत्न अन्यायकारक आहे.
गुरुवार, नोव्हेंबर ०६, २०१४
भारताचा पाकिस्तान होऊ नये
'हे कसले पाक' (6 नोव्हेंबर) हा अन्वयार्थ लोकसत्तामध्ये वाचला. पाकिस्तानच्या कोट राधाकिशन या गावात एका ख्रिस्ती दाम्पत्याला ईश्वरनिंदेच्या आरोपावरुन ठार मारण्यात आले. पाकिस्तान हा धर्मांध विचाराने कसा गुरफटला आहे त्याची प्रचिती आली. कट्टर धर्मांधता आणि त्यामाध्यमातून होणारा हिंसाचार ही सर्वच जगाची अतिशय गंभीर समस्या आहे. धर्म, धार्मिक प्रतिके यांची विटंबना किंवा निंदा केल्याच्या आरोपावरुन अनेकाना आपला जीव गमवावा लागला आहे. पाकिस्तानचे राज्यकर्ते, तिथले लष्कर आणि धार्मिक नेते यानी पाक मधील सामाजिक वातावरण नेहमीच गढूळ ठेवले. कट्टर धर्मांधता जोपासत त्यानी
शनिवार, ऑक्टोबर २५, २०१४
भय इथले संपत नाही...
विधानसभेची
निवडणूक नुकतीच संपली, ज्यामध्ये मतदारराजाने भारतीय जनता पक्षाच्या
पारड्यात तुलनेने जास्त मताधिक्य टाकले आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी
कॉंग्रेस यांच्या १५ वर्षे सत्तेत असलेल्या आणि कथित फुले-शाहू-आंबेडकरवादी
सरकारचा जोरदार पराभव झाला. समतावादी भूमिका असलेल्या या आघाडी सरकारच्या
काळामध्ये महाराष्ट्रात खैरलांजी दलित हत्याकांड घडलं, जिथे भोतमांगे
कुटुंबियांना दीर्घ प्रतीक्षेनंतर तुटपुंजा न्याय मिळाला. जातीय अत्याचार
आणि दलितांवरील हल्ल्यांचे सत्र सर्वत्र वाढत असताना अहमदनगर जिल्ह्यामध्ये
अशा स्वरूपाच्या हिंसेचे क्रौर्य वाढलेले दिसते. नेवासा येथील सोनई
हत्याकांड असो की खर्डा येथे नितीन आगे या महाविद्यालयीन तरुणाचा केलेला
खून, या प्रकारच्या हल्ल्यांमधून ना सरकारी यंत्रणा शहाणी झाली, ना
अन्यायाला वाचा फोडणारे आपण यातून काही शिकलो आहोत!
गुरुवार, ऑक्टोबर २३, २०१४
खैरलांजी, खर्डा आणि आता जवखेडे...
दलित हत्याकांड हा समाजात नेहमीच ऐरणीवर असणारा विषय आहे. कारण वरचेवर देशात दलित समाजातील व्यक्तींवर अन्याय, अत्याचाराच्या घटना घडत आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे पुरोगामी म्हणवला जाणारा महाराष्ट्र दलितांवरील अन्याय, अत्याचारात सर्वात पुढे आहे. सहा-सात वर्षांपूर्वीच सार्या समाजमनाचा थरकाप उडवणारे खैरलांजी हत्याकांड झाले. या बिभत्स हत्याकांडाने महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे सामाजिक वातावरण ढवळून निघाले. एकाच कुटूंबातील चार व्यक्तींची हत्या आणि त्या कुटुंबातील माय-लेकींवर झालेला बलात्कार याने कोणत्याही संवेदनशील माणसाचे मन द्रवले असेल.
रविवार, ऑक्टोबर ०५, २०१४
आरक्षण...आंदोलने आणि राजकारण...!
संजय सोनवणी, ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत.
यंदाचे वर्ष धनगर, कोळी, वडार, रामोशी, हलबा-कोष्टी अशा अनेक भटक्या विमूक्त समुहांतील जाती-जमतींच्या आरक्षणासाठीच्या उग्र आदोंलनांनी गाजले. त्याला विधानसभा निवडणुकीचीही पार्श्वभुमी होती. धनगर समाज तर प्रथमच एवढ्या प्रचंड सम्ख्येने रस्त्यावर उतरला. माध्यमांनी पुरेशी दखल घेतली नसती तरी स्वातंत्र्योत्तर काळात एवढा मोठा जनसमूह रस्त्यावर उतरल्याचे उदाहरण नाही. एकाच दिवशी ४०० ठिकाणी आंदोलने घडवायचा विक्रमही झाला.
बुधवार, ऑक्टोबर ०१, २०१४
भारत-चीन संबंध: युद्ध व्यापाराच्या मैदानात...
प्रकाश पोळ.
--------------------------------------------------------
19 सप्टेंबरच्या सकाळमध्ये 'सावध ऐका,चिनी हाका' हा अग्रलेख वाचला. अग्रलेखात म्हंटल्याप्रमाणे भारत आणि चीन यांच्यातील परस्पर संबंधामध्ये प्रगती साधण्यातील मुख्य अडथळा सीमाप्रश्नाबरोबरच परस्पर व्यापारातील तूट हाही आहे. गेल्या काही वर्षात चीनकडून होणारी भारताची आयात लक्षणीय प्रमाणात वाढली आहे. परंतू भारत करत असलेली निर्यात मात्र त्या प्रमाणात वाढताना दिसत नाही. 1990-91 पर्यंत भारतासोबत
गुरुवार, सप्टेंबर ११, २०१४
लोकप्रिय लेख- sahyadribana
- अतिशय लोकप्रिय लेख;
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण ?
- अण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न ?
- संभाजीराजांचा मृत्यू मनुस्मृती प्रमाणे ?
- गणपतीचे मूळ, गणपती उत्सव आणि बहुजन समाज
- छत्रपती शिवराय आणि अफझलखान वध
- बाबासाहेब पुरंदरे : समज; गैरसमज
- राजर्षी शाहू महाराज :लोक कल्याणकारी राजा
- भिडे गुरुजी, जगण्याची लढाई शिकवा
- स्त्रियांवरील वाढते अत्याचार : सामाजिक अवनतीचे लक्षण
- संस्कृतीच्या ठेकेदारांची विकृती
- यशवंतराव होळकर आणि इतिहासाचा विपर्यास
बुडत्याचा पाय खोलात...
पणन संचालक सुभाष माने यांच्यावरील कारवाईचा निषेध
सध्या आघाडी सरकारच्या विरोधात वारे फिरत असल्याने सत्ताधारी मंडळी बावचाळली आहेत. कधीही सत्तेबाहेर रहायची सवय नसलेल्या कोंग्रेस-राष्ट्रवादीने सत्ता जाणार या भितीने अनेक उपद्व्याप सुरु केले आहेत. सत्ता मिळवण्यासाठी अनेक बेकायदेशीर गोष्टी करण्यामुळे आघाडी सरकारचीच प्रतिमा मलीन होत आहे याचे त्याना भान राहिलेले नाही. पणन संचालक सुभाष माने यांच्यावरील कारवाई ही आघाडी सरकारने सूडबुद्धीने केली आहे हे सर्वानाच माहीत आहे. सध्याच्या काळात भ्रष्टाचाराचे पेव फुटले आहे. लोकप्रतिनिधी, मंत्री, अधिकारी आणि सामान्य माणूस असे सर्वच या भ्रष्टाचाराच्या चक्रव्युहात अडकले आहेत. यात एखादा
शुक्रवार, ऑगस्ट २९, २०१४
गणपतीचा सिंधूकालीन इतिहास
गणपतीपूजनाचे भौतिक पुरावे आपल्याला सिंधू संस्कृतीकाळापास ून मिळतात. हडप्पा येथे गणपती शीर्षाचे शिल्प मिळाले आहे. म्हणजेच भारतात गणपतीपूजन हे किमान पाच हजार वर्षं जुने आहे. तंत्र-गणपतीमुळे तो जगभर पसरला. अवैदिक शैवजनांचा गणपती कालौघात वैदिकजनांनीही आपले धर्मसंस्कार करत स्वीकारला. गणपती या दैवताचा विकास कालौघात कसा झाला याचा दैवतेतिहासाच्या संदर्भात धर्मशास्त्राचे अभ्यासक संजय सोनवणी घेतलेला रोचक धांडोळा...
शुक्रवार, ऑगस्ट १५, २०१४
यांच्या स्वातंत्र्याचं काय ?
15 ऑगष्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. ब्रिटीशानी जखडलेल्या गुलामीच्या बेड्या आपण तोडल्या. दरवर्षी 15 ऑगष्ट रोजी आपण स्वातंत्र्यदिन साजरा करतो. हा आनंदाचा, अभिमानाचा दिवस आहे हे मान्यच....परंतु हे स्वातंत्र्य खरोखर समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचलय का याचा विचार समस्त भारतीयानी करावा असे मला वाटते. आजही अनेक लोकाना रहायला निवारा नाही, अनेकाना गाव नाहे, या देशाचे नागरिक असल्याची त्यांची कोणतीही ओळख नाही. या गावकुसाबाहेरच्या,
शनिवार, जुलै २६, २०१४
हिंदू हा प्रदेशवाचक शब्द
महराष्ट्र सदनात झालेल्या प्रकारावरुन संसदेत गदारोळ चालू असताना भाजपच्या एका खासदार महाशयानी हे राष्ट्र हिंदूंचे आहे, रहायचे असेल तर रहा नाहीतर ........ला निघून जा असे वादग्रस्त वक्तव्य केले. दुसरीकडे 'पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेत्रुत्वाखाली भारत हिंदू राष्ट्र म्हणून उदयास येईल असे विधान गोवा मंत्रीमंडळातील एका मंत्र्याने केले. त्यावर गोव्याचे
शनिवार, नोव्हेंबर ०२, २०१३
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
पुणे विद्यापीठाच्या
अधिसभेच्या बैठकीत पुणे विद्यापीठाचा “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ” असा नामविस्तार करण्याचा ठराव एकमताने
पास केला. या निर्णयामुळे पुरोगामी वर्तुळात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे तर
दुसऱ्या बाजूला सावित्रीबाई आणि महात्मा फुलेंच्या विचारांना नेहमी विरोध करणाऱ्या
समूहामध्ये नाराजी पसरली आहे. या नामविस्ताराचा मुहूर्त साधून अनेकांनी पुणे
विद्यापीठाच्या गुणवत्तेची चर्चा सुरु केली आहे. एरव्ही आपल्याला गुणवत्तेचे फारसे
देणे-घेणे पडले नसताना आरक्षण किंवा नामांतर अशा प्रकारच्या गोष्टी समोर आल्या की
लगेच आपणाला गुणवत्ता आणि मेरीट आठवते. दुर्दैवाची बाब ही की या मेरीट किंवा
गुणवत्तेची चर्चा फक्त फुले-आंबेडकर अशा ठराविक नावामुळेच होत असते.
मंगळवार, ऑक्टोबर ०८, २०१३
दाभोलकर हत्येचा तपास सीबीआयकडे द्या
ता. २० ऑगस्ट २०१३ या दिवशी अंधश्रद्धा निर्मुलन
समितीचे संस्थापक अध्यक्ष आणि साधनाचे संपादक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा अज्ञात
मारेकर्यांनी निर्घृण खून केला. त्यानंतर महाराष्ट्र आणि देशभरातून त्याविरोधात
तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. जनभावना लक्षात घेवून महाराष्ट्र सरकारने जादूटोणा
विरोधी कायद्याचा अध्यादेश काढला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि गृहमंत्री आर.
आर. पाटील यांनी त्यावेळी दाभोलकरांच्या हत्येचे सूत्रधार आणि सर्व षड्यंत्र
समाजासमोर आणण्याची घोषणा केली. त्यानंतर आज दीड महिना उलटून गेला तरी पोलिसांना
काहीच सुगावा लागलेला नाही.
.
.



प्रकाश पोळ

Posted in: 















