शुक्रवार, ऑगस्ट ०३, २०१२
गुरुवार, ऑगस्ट ०२, २०१२
वाघ्याला हटवण्याची संभाजी ब्रिगेडची कृती फुले-शाहू-आंबेडकरवादास घातक
अखेर रायगडवरील
बहुचर्चित वाघ्या कुत्र्याचा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हटवला.
गेले अनेक दिवस वाघ्या कुत्र्याच्या प्रश्नावरून उलट-सुलट चर्चा चालू होती. दादोजी
कोंडदेव यांचा पुतळा काढल्यानंतर संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेत रायगडवरील
वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढण्यासाठी जोरदार आंदोलन उभे केले होते. वाघ्याचा पुतळा शिवरायांच्या एका महाराणीच्या समाधीवर
ब्राम्हणांनी जाणीवपूर्वक उभा केला आहे. त्यामुळे छत्रपती शिवराय आणि त्यांच्या
महाराणी यांची बदनामी करणाऱ्या या कुत्र्याचा पुतळा रायगडवरून काढून टाकावा अशी
संभाजी ब्रिगेडची भूमिका होती. (संभाजी ब्रिगेडच्या सविस्तर भूमिकेसाठीक्लिक करा.) परंतु रायगडवरील शिवस्मारकाला इंदूरचे महाराजा
तुकोजीराव होळकर तृतीय यांनी आर्थिक मदत केली असल्याने धनगर समाजाचा वाघ्याचा
पुतळा काढण्याला विरोध होता. महाराजा तुकोजीराव होळकर तृतीय यांच्या देणगीतून
वाघ्याचा पुतळा रायगडावर उभा करण्यात आला. (त्यासाठी होळकरांच्या
कुत्र्याची दंतकथाही निर्माण करण्यात आली.)
शुक्रवार, जुलै २७, २०१२
खरे आयडॉल- प्राच्यविद्यापंडीत कॉम्रेड शरद् पाटील
लेखक-
किशोर मांदळे
सर्वच चळवळींना अरिष्टात
सापडण्याचा भोग अटळ असतो. चळवळीचे अरिष्ट नेमके कोणते ते आकलल्याशिवाय
त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही सापडू शकत नाही. चळवळींना अरिष्टातून बाहेर
काढण्याचे दिव्य विद्यापीठांच्या "आयव्हरी टॉवर'मधील विचारवंतांच्या आवाक्यातले कधीच नसते. त्यासाठी चळवळीच्या
रणमैदानातूनच "द्रष्टा पुढे यावा लागतो. या द्रष्ट्याचीही वाटचाल सोपी नसते.
कारण, तत्वज्ञानाने कर्मठ बनलेल्या श्रद्धा त्याला मोडीत काढाव्या
लागतात. मार्क्सवादाच्या "सार्वभौम श्रद्धेला' आव्हान देऊन त्याचे
दार्शनिक अरिष्ट जगासमोर मांडणे म्हणजे तर केवढे पाखंड! हे पाखंड कॉ. शरद्
पाटील यांनी तीन दशकांच्या मागेच केले.आत्मरत डाव्या प्रस्थापितांनी कॉ. शरद्
पाटलांची कोंडी
रविवार, जून २४, २०१२
राजर्षी शाहू महाराज :लोक कल्याणकारी राजा
"सर्वसामान्य बहुजन समाजाला गुलामगिरीच्या दलदलीतून बाहेर काढून स्वाभिमानाचे नवे जीवन देणाऱ्या काही मोजक्या समाजसुधारकांमध्ये राजर्षी शाहूंचा समावेश होतो. राजर्षी शाहू आणि इतर समाज सुधारक यांच्यात महत्वाचा फरक म्हणजे राजर्षी शाहुंकडे राजसत्ता होती. त्याआधारे ते बहुजन समाजाच्या हिताचे निर्णय राबवू शकत होते.त्यासाठी त्यांना दुसऱ्यांची मनधरणी करावी लागली नाही.राजर्षी शाहू हे प्रजावत्सल, दलितबंधू, समतेचे पुरस्कर्ते आणि निधड्या छातीचे कर्ते समाजसुधारक होते."
शाहू राजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव व आईचे नाव राधाबाई होते. शाहूंचे बालपणीचे नाव यशवंतराव होते. १७ मार्च १८८४ रोजी शाहूंचे दत्तकविधान व राज्यारोहण झाले. यशवंतरावाचे दत्तकविधानानंतर ‘शाहू महाराज’ असे नामकरण झाले. शाहूंनी आपल्या आयुष्यात जातीभेद निर्मुलन, अस्पृश्यता निवारण, स्त्रियांचा उद्धार, बहुजनांचा शैक्षणिक विकास, औद्योगिक प्रगती, शेतीचा विकास, धरणे, रस्ते ई. क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावली. आपली राजसत्ता खऱ्या अर्थाने उपेक्षित, वंचित समाजासाठी वापरली. त्यामुळे शाहू हे लोकांचे राजे झाले.
''ओबीसी चळवळीच्या संघर्ष वाटा''- भाग 4
1990 ला RSS-BJP
ने पुन्हा अशाच षडयंत्राची रचना केली. परंतू ब्राम्हणी व अब्राम्हणी या दोन्ही
शत्रूंनी एकमेकांचा मागचा अनुभव पाहता, RSS-BJP चे नेते जसे हुशार
झाले होते तसे ओबीसी नेतेही सतर्क व सावध झाले होते. 1989चा जनता दल व 1977
चा जनता पक्ष यांच्यात बराच मुलभूत फरक होता. परिस्थितीही आमूलाग्र बदललेली होती.
यावेळी RSS-BJP ने संभाव्य मंडलविरोधी लढ्याची तयारी खूप
आधीपासूनच सुरु केलेली होती. त्यांनी आपल्या पक्षात ओबीसी जातीतून भरपूर
शनिवार, जून १६, २०१२
''ओबीसी चळवळीच्या संघर्ष वाटा''- भाग 3
आतापर्यंत आपण प्रस्थापित
कॉंग्रेसधर्मी पक्षांमधील ओबीसी नेत्यांबाबत चर्चा करीत होतो. आता आपण मूळ ओबीसी
चळवळीतून निर्माण झालेल्या ओबीसी नेत्यांबाबत विचार करु या! तात्यासाहेब महात्मा
जोतीराव फुले यांच्या जातीअंतक सत्यशोधक चळवळ ब्राम्हण-मराठा युतीने दडपून टाकताच
तीने एकीकडे तामीळनाडूत तर दुसरीकडे बिहारात मूळ धरले. तामीळनाडूत पेरियार ई.
व्ही. रामास्वामी
गुरुवार, जून १४, २०१२
''ओबीसी चळवळीच्या संघर्ष वाटा''- भाग 2
जर जातीव्यवस्था
वर्गव्यवस्थेप्रमाणे खूली राहीली असती तर आज ओबीसी नेतेपदी मुंडे-भूजबळांच्याऐवजी
जोशी-कुलकर्णी दिसले असते. बाबरी मशिद पाडण्यासाठी जुंपलेल्या या हिंदू नेत्यांवर ओबीसी
नेतृत्वाची झूल का टाकण्यात आली? ते पुढीलप्रमाने समजून
घेता येईल ----
व्हि. पी. सींग सरकार व
बाबरी मशिद पाडतांना मंडल आयोगाचा क्रांतीकारक सामाजिक व राजकीय गाभा बर्याच
प्रमाणात गाडला गेल्यानंतर ओबीसी जातीतील या हिंदू नेत्यांचे एक काम संपलेले होते.
आर्थिक व राजकीय उठाव कायमचे उखडून टाकता येतात, सामाजिक असंतोष मात्र
मंगळवार, जून १२, २०१२
''ओबीसी चळवळीच्या संघर्ष वाटा''- भाग 1
लेखक- प्रा. श्रावण देवरे
![]() |
| प्रा. श्रावण देवरे |
''ओबीसी चळवळीच्या संघर्ष वाटा'' हे पुस्तक 6 महिन्यापुर्वीच लिहुन तयार आहे.
आर्थिक स्थिती बरी असलेल्या ओबीसी नेत्यांना व कार्यकर्त्यांना पुस्तक छपाईसाठी
आर्थिक मदतीची विनंती केली. परंतू फारसा चांगला अनुभव नाही. ईलेक्शनची हौस भागविन्यासाठी आमचे ओबीसी
3/4 लाख रुपये सहज उडवुन टाकतात. परंतू चळवळीला मार्गदर्शक ठरणारे
पुस्तक छपाईसाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत.
या पुस्तकातील एक लेख आपल्या सह्याद्री बाणाच्या वाचकांसाठी----------
शुक्रवार, एप्रिल ०६, २०१२
पल्लवी रेणके : चळवळीतल्या सर्वांची लाडकी लेक
![]() |
| पल्लवी रेणके |
फुले-आंबेडकरी तत्त्वज्ञानाशी आणि ध्येयवादाशी पक्की नाळ जुळलेली पल्लवी
गेलं दशकभर भटक्याविमुक्तांच्या चळवळीसाठी पूर्णवेळ आणि विना मानधन झटत
आहे. तिच्या डोळ्यापुढे व्यवस्था परिवर्तनाचं आणि जात, वर्ग, लिंगभेद
निर्मुलनाचं स्वच्छ संकल्पचित्र आहे... सामाजिक कार्यकर्ती असलेल्या पल्लवी
रेणकेबद्दल सांगत आहेत तिचे वडील, भटक्या-विमुक्तांचे नेते बाळकृष्ण
रेणके.
रविवार, एप्रिल ०१, २०१२
विचारवंत कलावंत : निळूभाऊ फुले
महाराष्ट्रात अनेक
मोठे कलावंत होऊन गेले, पण दुर्गमातल्या दुर्गम खेडय़ापर्यंत आणि तिथल्या शेवटच्या
माणसापर्यंत पोहोचलेली जी काही मोजकी नावे असतील, त्यात निळू फुले यांचे नाव अग्रक्रमाने येते. चित्रपटसृष्टीपुरती तुलना करायची तर फक्त
दादा कोंडके आणि अशोक सराफ यांची लोकप्रियता निळूभाऊंच्या जवळपास पोहोचते. त्यातही पुन्हा हे
दोघे फक्त लोकप्रियतेच्या बाबतीत निळूभाऊंच्या
जवळपास जातात.
रविवार, मार्च १८, २०१२
शनिवार, मार्च १७, २०१२
'आंबेडकर' समजून घ्या!
![]() |
| डॉ. बाबासाहेब आंबेडकर |
आधुनिक भारताच्या जडणघडणीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान
ऐतिहासिक स्वरूपाचे आहे. मात्र असे असूनही आपल्या एकूणच सार्वजनिक जीवनात
त्यांचे हे ऐतिहासिक योगदान ध्यानात घेतले जात नाही, ही या देशाची एक फार
मोठी शोकांतिका आहे. डॉ. आंबेडकरांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे विविध
पैलू पाहिले की कुणीही आश्चर्याने थक्क व्हावे.
अमेरिकेतील विश्वविख्यात कोलंबिया विद्यापीठ आणि इंग्लंडमधील लंडन विद्यापीठ (सध्याचे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स) या दोन विद्यापीठांच्या अनुक्रमे पीएच. डी. आणि डी. एस्सी. या पदव्या घेतलेला एक श्रेष्ठ अर्थशास्त्रज्ञ; 'मूकनायक' आणि 'बहिष्कृत भारत'चे झुंजार संपादक;
अमेरिकेतील विश्वविख्यात कोलंबिया विद्यापीठ आणि इंग्लंडमधील लंडन विद्यापीठ (सध्याचे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स) या दोन विद्यापीठांच्या अनुक्रमे पीएच. डी. आणि डी. एस्सी. या पदव्या घेतलेला एक श्रेष्ठ अर्थशास्त्रज्ञ; 'मूकनायक' आणि 'बहिष्कृत भारत'चे झुंजार संपादक;
बुधवार, मार्च ०७, २०१२
जातीअंतासाठी आंतरजातीय विवाह आवश्यक
पुरोगामी महाराष्ट्रात
प्रत्येक सामाजिक चळवळीमध्ये अग्रेसर असणारा सातारा जिल्हा. या सातारा जिल्ह्यातील
औंध या गावी माणुसकीला काळीमा फासणारी ‘ऑनर किलिंग’ ची घटना घडली. या गावातील आशा
शिंदे ही उच्चशिक्षित तरुणी. साताऱ्याच्या सोशल सायन्स कॉलेजमधून तिने एम. एस.
डब्ल्यू. केले होते. पुण्यातील एका नामांकित कंपनीत ती कार्यरत होती. विचाराने
आधुनिक. जात-पात या गोष्टी गौण आहेत असे तीचे मत. ती एका परजातीतील मुलाच्या
प्रेमात पडली.
रविवार, मार्च ०४, २०१२
आद्य महिला स्वातंत्र्य सेनानी भीमाबाई होळकर !
जागतीक पातळीच्या इतिहाससंशोधकांनी आद्य महिला स्वातंत्र्य सेनानीचा सन्मान
दिलेल्या भीमाबाई होळकरांना आमच्या इतिहासाने मात्र काळाच्या कालकुपीत दफन
करुन ठेवले आहे, हे एक दुर्दैवच आहे. आज जागतीक महिला दिनाच्या निमित्ताने
अठराव्या शतकात शिक्षित असलेली, परंपरेच्या जोखडाखाली न वाढवली गेलेली,
पिता यशवंतराव होळकरांच्या पावलावर पाउल ठेवत ब्रिटिशांशी सर्वकश युद्ध
पुकारणारी ही महान वीरांगना.
शनिवार, फेब्रुवारी २५, २०१२
बहुजन समाज आत्मपरीक्षण करणार का?
हा लेख बहुजनांच्या विरोधात किंवा ब्राम्हणांच्या बाजूने नाही. बहुजनांनी आत्मपरीक्षण करावे या एकाच हेतूने तो लिहिला आहे. - महावीर सांगलीकर.
स्वत:ला बहुजन समजणा-या प्रत्येकाने आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. पहिली गोष्ट म्हणजे भारतात बहुजन नावाचा कोणताही समाज अस्तित्वात नाही. जशी हिन्दू या शब्दाची व्याख्या नाही, तशीच बहुजन या शब्दाचीही व्याख्या नाही. ब्राम्हण सोडून बाकी सगळे बहुजन ही बहुजन या शब्दाची व्याख्या होवू शकत नाही
स्वत:ला बहुजन समजणा-या प्रत्येकाने आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. पहिली गोष्ट म्हणजे भारतात बहुजन नावाचा कोणताही समाज अस्तित्वात नाही. जशी हिन्दू या शब्दाची व्याख्या नाही, तशीच बहुजन या शब्दाचीही व्याख्या नाही. ब्राम्हण सोडून बाकी सगळे बहुजन ही बहुजन या शब्दाची व्याख्या होवू शकत नाही
बुधवार, फेब्रुवारी २२, २०१२
स्वतंत्र पुरोगामी भूमिका घेणे म्हणजे ब्राह्मणद्वेष का ?
सह्याद्री बाणावर लिखाण करताना एक आरोप नेहमीच होत आला आहे तो म्हणजे ब्राह्मणद्वेष. तुम्ही ब्राम्हणांचा द्वेष करता असे मला अनेक ब्राम्हण म्हणतात. पण मी कसा ब्राह्मणद्वेष करतो ते मात्र सांगत नाही. मला आश्चर्य वाटते की मी इतकी संयमी मांडणी करूनही हे लोक नेहमी तेच-तेच आरोप करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. माझ्यावर ब्राम्हणद्वेषाचा आरोप करणाऱ्या लोकांना मी एका प्रतिक्रीयेद्वारे उत्तर दिले आहे. ती प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे-
शनिवार, फेब्रुवारी ११, २०१२
बुद्ध धम्म , वादविवाद: काल आज आणि उद्या
प्राचीन काळी बौद्ध भिक्खुंमध्ये धम्मा विषयी वादविवाद निर्माण होत असत , काही तत्व, आचार विचार विषयी मतभिन्नता निर्माण होत असे तेव्हा ते वाद मिटविण्यासाठी धम्म संगीतीचे आयोजन करण्यात येत असे. या संगीति अनेक महिने, वर्ष चालत असत. बुद्धांच्या महापरिनिर्वाणा नंतर चार महिन्या नंतर प्रथम धम्म संगीतीचे आयोजन शिशुनाग वंशातील राजा 'अजातशत्रू' यांनी राजगृह येथे केले होते. स्थविर उपाली आणि बुद्धांचा आवडता शिष्य आनंद यांची या संगीतीसाठी प्रमुख पदी निवड करण्यात आली होती. ही संगीति सात महिने चालली. मानवाच्या कल्याणासाठी भदंत आनंद यांच्या मार्गदर्शना खाली बुद्ध तत्व प्रणाली तयार करण्यात आली.
शनिवार, फेब्रुवारी ०४, २०१२
'सह्याद्री बाणा'ची एका वर्षातील वाटचाल
गुलामगिरी, अज्ञान,
दारिद्र्यात खितपत पडलेल्या बहुजन समाजाच्या व्यथा मांडण्यासाठी एक वर्षापूर्वी (नोव्हेंबर
२०१०) सह्याद्री बाणा हा ब्लॉग तयार केला. आजपर्यंत ज्या-ज्या महामानवांनी
प्रस्थापित ब्राम्हणी व्यवस्थेविरुद्ध संघर्ष केला त्या शिवराय-फुले-शाहू-आंबेडकरांच्या
कार्यापासून प्रेरणा घेवून सह्याद्री बाणा ने एक वर्ष वाटचाल केली. बहुतांश बहुजन
समाज हा अशिक्षित आणि
वैदिक लढाया आणि सुसंस्कृतपणा (?)
निरपराध शम्बुकाला रामाने ठार मारले. शंबूक हा तथाकथित शूद्र वर्णातील असून
त्याने विद्या ग्रहण केली, हा त्याचा अपराध होता काय? यात रामाचे समर्थन कसे होईल. हे सुसंस्कृत युद्धाचे उदाहरण आहे का ? वामनाने तीन पावलाची जमीन मागून कपटाने निष्कपट बळीराजाला ठार केले हा
सुसंस्कृतपणा आहे का ? परशुरामाने अत्यंत क्रौर्याने आपल्या आई
आणि भावाना ठार मारले हा सुसंस्कृतपणा आहे का ? सुग्रीव आणि
वाली यांच्या संघर्षात निरपराध वालीला रामाने क्षात्रधर्म बाजूला सारून मारले हे
रामाचा सुसंस्कृतपणा दर्शवते की कपट ? वालीचा कोणता
अपराध होता ? अशी शेकडो उदाहरणे देता येतील. इंद्राने
ऋषीच्या बायकोला
फसवून तिच्यावर केलेला अत्याचार काय दर्शवतो.
Posted in: वैदिक धर्मगुरुवार, जानेवारी १९, २०१२
महान क्रांतिकारक: संगोळी रायन्ना
(सदर लेख लिहिताना विश्वाचा यशवंत नायक या मासिकातील एस. एल. अक्कीसागर यांच्या लेखाचा खूप उपयोग झाला.)
संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात महाराष्ट्रातील एक विद्वान म्हणायचे, “इतर राज्यांना फक्त भूगोल आहे, पण महाराष्ट्राला भूगोलासह इतिहासही आहे.” स्वताचा गौरव कुणाला आवडणार नाही. त्यामुळे सहाजिकच त्यांच्या या वक्तव्यावर आपल्या धडावर दुसऱ्यांचे डोके असणाऱ्या महाराष्ट्रातील बहुजन समाजाने मनापासून टाळ्या वाजवल्या. स्वताचा गौरव करणे ही काय वाईट गोष्ट नाही. परंतु या गौरवाला अहंकाराचा स्पर्श झाला तर इतिहासाचे विकृतीकरण व्हायला वेळ लागत नाही.
संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात महाराष्ट्रातील एक विद्वान म्हणायचे, “इतर राज्यांना फक्त भूगोल आहे, पण महाराष्ट्राला भूगोलासह इतिहासही आहे.” स्वताचा गौरव कुणाला आवडणार नाही. त्यामुळे सहाजिकच त्यांच्या या वक्तव्यावर आपल्या धडावर दुसऱ्यांचे डोके असणाऱ्या महाराष्ट्रातील बहुजन समाजाने मनापासून टाळ्या वाजवल्या. स्वताचा गौरव करणे ही काय वाईट गोष्ट नाही. परंतु या गौरवाला अहंकाराचा स्पर्श झाला तर इतिहासाचे विकृतीकरण व्हायला वेळ लागत नाही.
.
.



प्रकाश पोळ














