संजय सोनवणी
१४ जानेवारीला पानिपतचे विनाशक युद्ध होऊन
२५१ वर्ष होत आहेत. मराठी सत्तेचा कणा मोडणारे हे युद्ध. ‘घरटी बांगडी
फुटली’ एवढा संहार या युद्धात झाला. या युद्धाबदल आणि त्यातील
युद्धनेत्यांच्या भूमिकांबद्दल वारंवार चर्चा होत आली आहे आणि होत राहील.
१४ जानेवारीला पानिपतचे विनाशक युद्ध होऊन २५१ वर्षे होत आहेत. मराठी
सत्तेचा कणा मोडणारे हे युद्ध. ‘घरटी बांगडी फुटली’ एवढा संहार या युद्धात
झाला. या युद्धाबद्दल आणि त्यातील युद्धनेत्यांच्या भूमिकांबद्दल वारंवार
चर्चा होत आली आहे आणि होत राहील. विजयाचे श्रेय घ्यायला सारेच येतात, पण
पराजय हा नेहमीच पित्रुत्वहीन असतो असे म्हणतात ते खरेच आहे. उलट एकमेकांवर
दोषारोप करण्याची अहमहमिका लागते. त्यातून सत्य हाती लागतेच, असे नाही.
कोणाचा तरी बळी चढवून सारे खापर त्याच्या माथी मारून मोकळे होणे
ही
सामान्यांची रीत झाली, पण इतिहास संशोधनात त्याला थारा नसतो.