गुरुवार, एप्रिल १४, २०११

महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १२ - कला

कला ही निसर्गनिर्मित सृष्टीला अधिक रमणीय बनविणारी मानवनिर्मित प्रतिसृष्टी असते. ती मानवाच्या अस्तित्वाला अधिक सुंदर बनविते. त्याच्या अंतर्बाह्य जीवनसत्त्वाला आविष्कृत करते, माणसा-माणसाला प्रसन्नपणे जोडते आणि समग्र मानवी जीवनाला आनंदमय करते. कोणत्याही कलाक्षेत्रातील कामगिरी हा त्या समाजाच्या नवनिर्माणक्षम प्रज्ञेचा एक अत्यंत महत्त्वाचा मापदंड असतो. माणसाच्या मनुष्यत्वाला उन्नत व

महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ११ - प्राच्यविद्या

पौर्वात्य देशांच्या सर्वांगीण अभ्यासासाठी विकसित करण्यात आलेली ज्ञानशाखा म्हणजे प्राच्यविद्या. भारतविषयक अशाच अभ्यासासाठी असलेल्या ज्ञानशाखेला भारतविद्या म्हणतात. प्राचीन/प्राचीनोत्तर भूतकालीन पदार्थ व घटना यांचे अध्ययन इ. करणारी पुरातत्त्वविद्या, महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी असलेले पुराभिलेखागार इत्यादींचा अंतर्भाव प्राच्यविद्येच्या क्षेत्रात होतो. प्राचीन वास्तू , उत्खननात सापडलेल्या वस्तू

महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १० - लेखन

१. युनिकोडचा अधिकृत वापर – संगणक माध्यमात देवनागरी लिपीच्या उपयोगाबाबत सर्वत्र एकवाक्यता नसल्याने मराठीतून संगणकीय संवाद साधण्यास मर्यादा येतात. म्‍हणून, जागतिक पातळीवर सर्व प्रमुख संस्थांनी एकत्र येऊन युनिकोडच्या अंतर्गत विकसित केलेल्या देवनागरी लिपीच्या प्रमाणित संस्करणाचा शासनव्यवहारात अधिकृत वापर करणे बंधनकारक करण्यात येईल. त्यामुळे सर्वसामान्य जनता आणि

महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ९ - अमराठी भाषकांसाठी उपक्रम

१. अन्य भाषांसाठी अकादमी - महाराष्ट्र शासनाने हिंदी, गुजराती, सिंधी आणि उर्दू भाषांतील साहित्यासाठी चार स्वतंत्र अकादमी स्थापन केल्या आहेत. यांपैकी प्रत्येक अकादमीला दरवर्षी आवश्यकतेनुसार पुरेशी आर्थिक तरतूद उपलब्ध करून देण्यात येईल. या अकादमींची माहिती गुजरात शासनाला कळविण्यात येईल. गुजरात राज्याची मातृभाषा असलेल्या गुजराती भाषेची अकादमी महाराष्ट्रात स्थापन करण्यात आलेली आहे,

महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ८ - अनुवाद

१. मराठीचा वापर व दुभाषांची मदत - राज्य शासनाचे मंत्री, प्रशासकीय प्रमुख, तसेच विभागप्रमुख इ. मान्यवरांनी शासकीय, सार्वजनिक कार्यक्रमांत बोलताना शक्यतो मराठी भाषेत बोलावे, अशी अपेक्षा ठेवण्यात येईल. अमराठी, विशेषत: परदेशांतील प्रतिनिधी यांच्या समवेत होणा-या अधिकृत बैठका/ कार्यक्रम यांमध्ये संवाद साधताना मराठीचे भाषांतर करण्यासाठी दुभाषाची/ अनुवादकाची मदत घेण्यात येईल. त्यामुळे मराठीचे

महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ७ - बृहन्महाराष्ट्र

१. बृहन्महाराष्ट्र परिचय पुस्तिका - बृहन्महाराष्ट्रातील तसेच विदेशांतील मराठी भाषकांच्या संस्थांचे स्वरूप, उद्दिष्टे, कार्य इत्यादींचा परिचय करून देणारी पुस्तिका प्रकाशित करण्यात येईल. ‘राज्य मराठी विकास संस्था’ यासाठी योजना तयार करील व राबवील. २. बृहन्महाराष्ट्र मंडळे साहाय्य - महाराष्ट्राबाहेर अन्य राज्यांत मराठी भाषा, साहित्य आणि महाराष्ट्रीय संस्कृती या संदर्भात कार्य करणार्‍या मान्यताप्राप्त संस्थांना तसेच

महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ६ - ग्रंथसंस्कृती

१. कोश-आवृत्त्या - विषयवार परिभाषा कोशांच्या सुधारित व संवर्धित आवृत्त्या प्रकाशित करण्यात येतील आणि त्या मराठी भाषकांना सहज प्राप्त होतील, अशी व्यवस्था करण्यात येईल. सर्व अनुदानित सार्वजनिक ग्रंथालयांना तसेच शाळा / महाविद्यालये / विद्यापीठे यांना हे कोश विकत घेणे बंधनकारक करण्यात येईल.
२. विश्वकोश प्रकल्पाला चालना –

महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ५ - लोकसंस्कृती

१. लोकसाहित्य समिती - लोकसाहित्याचे संकलन व प्रकाशन करण्यासाठी कार्यरत असलेल्या लोकसाहित्य समितीला अधिक आर्थिक तरतूद उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच या समितीचे कार्य अधिक व्यापक करण्यात येईल.
२. आदिवासी कोश - महाराष्ट्रातील आदिवासींचा सामाजिक-सांस्कृतिक-मानववंशशास्त्रीय दृष्ट्या समग्र

महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ४ - भाषा आणि साहित्य

ज्ञानाचे संचयन आणि संक्रमण स्थलकालांच्या मर्यादा ओलांडू शकते, ते प्रामुख्याने भाषेमुळेच होय. संगीतनृत्यांपासून ते चित्रशिल्पांपर्यंत नानाविध कलांना अधिक आस्वाद्य बनविण्याचे कार्यही भाषा नक्कीच करते. ती एकीकडे व्याकरणाच्या आणि लेखनपद्धतीच्या नियमांचा मानही राखते आणि दुसरीकडे काळाच्या ओघात त्या नियमांच्या संहितेला वेगळे वळण देऊन आशयाला सतत ताजेपणाही देत राहते. ती ललित साहित्यापासून ते गंभीर विवेचनापर्यंत विविध मार्गांनी अंतर्बाह्य सृष्टीला अभिव्यक्त करते. भाषेचे हे अंगभूत

महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ३ - अग्रक्रम

प्रस्तुत सांस्कृतिक धोरणात अंतर्भूत करण्यात आलेल्या सर्वच बाबी आपापल्या परीने महत्त्वाच्या असल्यामुळे त्यांच्या संदर्भातील कार्यवाही लवकरात लवकर करण्यात येईल. तथापि या समग्र धोरणाची अंमलबजावणी योग्य त्या कार्यक्षमतेने करण्याच्या दृष्टीने सांस्कृतिक क्षेत्रातील काही मूलभूत बाबींच्या पूर्ततेकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. अशा काही बाबींची नोंद या धोरणाच्या प्रारंभी अग्रक्रम म्हणून करण्यात आली असून शासन त्यांची अंमलबजावणी तत्परतेने करील.

महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- २ - धोरणाची पायाभूत तत्‍त्‍वे

महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या स्‍थापनेला यंदा पन्‍नास वर्षे पूर्ण होत आहेत. राज्यस्थापनेपासूनच या संपूर्ण कालखंडात महाराष्ट्र शासनाने विविध सांस्कृतिक उपक्रम राबविले आहेत. तरीही सांस्‍कृतिक क्षेत्रात आतापर्यंत झालेल्‍या महाराष्‍ट्राच्‍या प्रवासाचा आढावा घेणे आणि भावी वाटचालीचे नियोजन करणे, या दृष्‍टीने हा क्षण निर्णायक महत्त्वाचा आहे. हे महत्त्व ध्यानात घेऊन आणि राज्‍यस्‍थापनेच्या सुवर्णमहोत्‍सवी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने राज्याचे सांस्कृतिक धोरण निश्चित केले आहे.

महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १ - भूमिका



कोणत्याही समाजाच्‍या प्रतिभेचा सर्वांगीण असा सामूहिक आविष्‍कार त्या समाजाच्‍या सांस्‍कृतिक मूल्‍यांमधून होत असतो. प्रकृतीवर म्‍हणजेच निसर्गाकडून जे काही प्राप्‍त झालेले असते त्‍यावर आपल्‍या विविधांगी सर्जनशीलतेच्‍या आधारे संस्‍कार करून मानव जे काही निर्माण करतो, ती त्‍याची संस्‍कृती होय. प्रत्‍येक व्‍यक्‍तीची संस्‍कृती ही दुस-या व्‍यक्‍तीच्‍या संस्‍कृतीहून

बुधवार, एप्रिल १३, २०११

बाबासाहेबांच्या गौरवशाली कार्य आणि विचारांना विनम्र अभिवादन.......

  डॉ. बाबासाहेब आंबेडकर
भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून बहुजन स्वातंत्र्याला कायद्याचे अधिष्ठान मिळवून देणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल हा जन्मदिवस. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समस्त बहुजन समाजाला स्वाभिमानाने जगण्यासाठी आपल्या विचार आणि आचारातून भक्कम वैचारिक बळ दिले. बाबासाहेबांच्या विचारांना स्मरून बहुजन समाजाने शैक्षणिक, सामाजिक आणि ...आर्थिकदृष्ट्या सक्षम बनाने गरजेचे आहे. जातीपातीच्या राक्षसाला गाडून टाकून सर्व भारतात बुद्धविचाराचा प्रसार करण्यासाठी आपण कटिबद्ध असले पाहिजे. बाबासाहेबांना अपेक्षित प्रबुद्ध भारत घडवणे हे आपले लक्ष्य आहे. 

सोमवार, एप्रिल ११, २०११

महात्मा फुलेंना विनम्र अभिवादन....

महात्मा फुले यांनी बहुजन समाजावरील ब्राम्हणांच्या गुलामगिरी विरुद्ध युद्ध उभारले. विभाजित आणि विस्कळीत असलेल्या बहुजन समाजाला समतेच्या एका धाग्यात गुंफून सत्यशोधन करायला भाग पाडले. बहुजन समाजाला त्यांचे खरे शत्रू आणि खरे मित्र यांची जाणीव करून दिली. बहुजन समाजाचा उज्वल आणि गौरवपूर्ण इतिहास महात्मा फुलेनीच आम्हाला समजून सांगितला. महात्मा फुले हे इतिहास आणि संस्कृती अभ्यासक होते. बळीराजा आणि इतर असुर हे आमचे खरे पूर्वज आहेत हे सत्य महात्मा फुलेंनी आम्हाला सांगितले. बहुजन समाजाला शैक्षणिक दृष्ट्या सबळ बनवून ब्राम्हणी वर्चस्वाला खिंडार पाडले. बहुजनांचे खरे महानायक आणि त्यांचे खरे स्वरूप फुल्यानीच समजावून सांगितले. 

गुरुवार, एप्रिल ०७, २०११

क्रिकेटचा विजय आणि वंचितांचे दुःख

विश्वचषक अंतिम सामन्यात भारत विजयी झाल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत बी.सी.सी.आय. ने प्रत्येक खेळाडूला एक करोड रुपये देण्याची घोषणा केली.  भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला आणि  गर्भश्रीमंत असणाऱ्या सर्व खेळाडूंवर बक्षिसांच्या रुपाने करोडो रुपयांची उधळण झाली.  खेळाडूंना पैसा देण्यास आमचा विरोध नाही. परंतु क्रिकेटकडे इतके लक्ष देत असताना या देशातील सर्वसामान्य लोकांचे प्रश्न नजरेआड करून चालणार नाहीत.  जे लोक  देशासाठी आपली जमीन देतात. त्यांच्या जमिनीवर अनेक प्रकल्प उभे राहतात, त्या लोकांना मात्र आपले गाव सोडून आश्रीतासारखं दुसऱ्याच्या गावात राहायला लागतं. त्यांच्या मुला-बाळांच्या शिक्षणाची आबाळ होते. या सर्व समस्या सोडवण्यासाठी हजारो लोक दररोज संघर्ष करत आहेत. खेळाडूंना सामना जिंकल्यावर बक्षीस देण्यासाठी जशी तत्परता दाखवली, तशी तत्परता प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी का दाखवली जात नाही ?  त्यांना दोन वेळच्या जेवणासाठी वणवण भटकावं लागतं. काबाडकष्ट करावे लागतात. यांनी केलेल्या त्यागामुळे प्रकल्प उभे राहतात. त्याचा लाभ संपूर्ण देशाला होतो. तरीही ज्यांनी त्याग केलाय त्यांच्याकडे पाहायला सरकारला सवड नाही. क्रिकेटचा सामना हरला तर आपण रागाने लालबुंद होतो. खेळाडूंना शिव्या देतो. जर सामना जिंकला तर रस्त्यावर येवून जल्लोष करतो. खूप आनंदित होतो. परंतु या देशात लाखो लोक अत्यंत दारिद्र्याचे जीवन जगत आहेत. त्याचे भान कुणाला आहे. या देशात अनेकांना आजही माणसाप्रमाणे स्वाभिमानी जीवन जगता येत नाही त्याचा खेद आपणाला वाटत नाही ? या देशात हजारो शेतकरी आत्महत्या करताहेत त्यांच्या कुटुंबियांचे अश्रू पुसण्यासाठी काय प्रयत्न होतात ? चार-दोन हजार रुपयांची सरकारी मदत मिळाली म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न सुटला असे समजायचे का ?

गुरुवार, मार्च ३१, २०११

'लंकादहन ' शब्दप्रयोग कशासाठी ?

भारताविरुद्ध असलेला पाकिस्तानचा सामना म्हणजे एक धर्मयुद्ध आहे, अशी भूमिका बऱ्याच लोकांनी घेतली. क्रिकेट सारख्या खेळाला धर्मयुद्धाचे, हिंदू-मुस्लीम वादाचे स्वरूप देवून सामान्य माणसाच्या भावना भडकावण्याचे पाप काही लोकांनी केले. पाक विरुद्धचा सामना आपण जिंकला. त्यानंतर अनेक लोकांनी प्रतिक्रिया देताना हिंदुनी मुसलमानावर विजय मिळवला अशा प्रकारची मांडणी केली. आता आपला अंतिम सामना श्रीलंकेबरोबर आहे. भारत अंतिम फेरीत पोहचला ही सर्व भारतीयांच्या दृष्टीने आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. त्याबद्दल जरूर तो आनंद व्यक्त करावा. परंतु आनंदाच्या प्रदर्शनाचा अतिरेक झाला तर मात्र आपला उन्मत्तपणा दिसून येतो. श्रीलंका हा भारताचा शत्रू नाही. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध मांडणी

मंगळवार, मार्च २९, २०११

भारत विरुद्ध पाक सामना म्हणजे धर्मयुद्ध नव्हे

बुधवार दिनांक ३० मार्च रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान हा विश्वकप क्रिकेट सामन्यातील उपांत्यफेरीतील सामना आहे. पाकिस्तान हा भारताचा पारंपारिक शत्रू आहे. त्यातच भारत हा हिंदुबहुल आणि पाकिस्तान हा मुस्लिमबहुल देश आहे. या दोन्ही धर्मातील कट्टरवादयानि दोन्ही धर्मातील तेढ नेहमी वाढतच ठेवली आहे. हिंदू विरुद्ध मुस्लीम हा वाद पेटवण्यासाठी त्या धर्मांध लोकांना निमित्तच हवे असते. ते निमित्त भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याने मिळाले. परंतु धर्मांध प्रवृत्तीने कोणाचाही फायदा न होता नुकसानच होत आहे, हे सामान्य माणसाने लक्षात ठेवले पाहिजे. क्रिकेट हा खेळ आहे. त्यात जय-पराजय ठरलेला आहे. एक संघ विजयी होणार आणि दुसरा पराभूत हे त्रिकालाबाधित सत्य आहे. (जर सामना बरोबरीत सुटला नाही किंवा पावसाने रद्द झाला नाही तर) मग असे असताना टोकाची धर्मांध भावना कशासाठी ? भारत-पाक क्रिकेट सामना म्हणजे काही हिंदू-मुस्लीम धर्मयुद्ध नव्हे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या देशाच्या संघाची बाजू घेवून त्याच्या विजयाची आशा ठेवणे गैर नाही. परंतु त्यामुळे दोन धर्मात तेढ वाढून विनाकारण सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये हीच इच्छा.

मंगळवार, मार्च २२, २०११

‘हरी नरके’ वादाची दुसरी बाजू

प्रा. हरी नरके
गेल्या काही दिवसात बहुजन चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रा. हरी नरके आणि बामसेफ, संभाजी ब्रिगेड यांच्यातील वादामुळे बहुजन कार्यकर्ते द्विधा मनस्थितीत सापडले आहेत. या वादात बामसेफ आणि संभाजी ब्रिगेडची बाजू ‘मुलनिवासी नायक’ मधून नेहमी मांडली जाते. परंतु हरी नरकेंची बाजू पाहण्यात आली नव्हती. एखाद्या वादग्रस्त गोष्टीवर लिहीत, बोलत असताना दोन्ही बाजू ऐकून घेणे क्रमप्राप्त आहे. एकच बाजू आपण सातत्याने मांडायची आणि दुसऱ्याची बाजू ऐकूनच घ्यायची नाही किंवा दुसऱ्याला त्याची बाजू मांडायची संधीही द्यायची नाही हा शुद्ध पक्षपातीपणा आहे. तो पक्षपातीपणा मी तरी करणार नाही. याआधी चारच दिवसापूर्वी मी या ब्लॉगवर

गुरुवार, मार्च ०३, २०११

महात्मा फुले यांचे मामा परमानंद यांस पत्र.

मामा परमानंद यांस पत्र.....................
मुक्काम पुणे त|| २ माहे जून १८८६ ई||
राजमान्य राजेश्री नारायणराव माधवराव परमानंद मु|| आंबेर

......................... साष्टांग नमस्कार वि.वि. आपले त|| ३० माहे गुदस्तचे कृपापात्र पावले. त्याचप्रे|| पुण्याचे हायस्कुलातील भागवतमास्तर यांनी शंकर तुकाराम यांनी छापलेला पवाडयाचे पुस्तकातील काही शाहिरांची एक याद मजला आणून दिली, यावरून मी त्यास येक वेळी कळवले कि, सदरचे पवाडयाची प्रत मजजवळ नाही

मंगळवार, मार्च ०१, २०११

महात्मा फुल्यांची बदनामी का होते ?

महात्मा फुले
महात्मा फुले यांनी बहुजन समाजावरील ब्राम्हणांच्या गुलामगिरी विरुद्ध युद्ध उभारले. विभाजित आणि विस्कळीत असलेल्या बहुजन समाजाला समतेच्या एका धाग्यात गुंफून सत्यशोधन करायला भाग पाडले. बहुजन समाजाला त्यांचे खरे शत्रू आणि खरे मित्र यांची जाणीव करून दिली. बहुजन समाजाचा उज्वल आणि गौरवपूर्ण इतिहास महात्मा फुलेनीच आम्हाला समजून सांगितला. महात्मा फुले हे इतिहास आणि संस्कृती अभ्यासक होते. बळीराजा आणि इतर असुर हे आमचे खरे पूर्वज आहेत हे सत्य महात्मा फुलेंनी आम्हाला सांगितले. बहुजन समाजाला शैक्षणिक दृष्ट्या सबळ बनवून ब्राम्हणी वर्चस्वाला खिंडार पाडले. बहुजनांचे खरे महानायक आणि त्यांचे खरे स्वरूप फुल्यानीच समजावून सांगितले. 

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes